धनलोभी दुःख पावतील अंती
धनलोभी दुःख पावतील अंती ।
कळेल देहांती प्राण जाता ||धृ ||
गरीब देतील त्रास चिडोनिया ।
लोभी म्हणोनिया निर्दयी हा ||1||
शेवटी सोडील पुत्र मरातब ।
धनासाठी जीभ कापतील ||2||
तुकडयादास म्हणे कोनि ना जुहार ।
करती महार प्राण जाता ||3||