धनाचा तो गर्व धरू नये अंगी

धनाचा तो गर्व धरू नये अंगी । 
कोण धनालागी तृप्त झाला ? ||धृ ||
धन कुबेराचे, कधी हे जाईल?। 
कोणासी पावेल? कळेना हे ||1||
श्रीमंत भिकारी झाले पाहतांना । 
कोण याच्या खुणा जाणताहे ? ||2||
तुकड्यादास म्हणे असो नसो धन। 
शील संपादून मग्न व्हावे ||3||