निःसार संसार सार हरी नाम ।

निःसार संसार सार हरी नाम । 
साधकां विश्राम देत आले ||धृ ||
तारिले पाषाण ऐसे महिमान । 
संतांचे वचन गर्जताहे ||1||
करोनिया चित्त शुद्ध एकेठायी । 
भजावा निर्भयी पांडुरंग ||2||
तुकड्यादास म्हणे धरोनी विश्वास। 
तरा सावकाश माया-डोही ||3||