प्रतिदिनी नाम स्मरा श्रीहरीचे

प्रतिदिनी नाम स्मरा श्रीहरीचे । 
तुटती भवाचे  बंध सारे ||धृ ||
अंगी धैर्य वाढे,  शांति ये मनात । 
सुखसागरात जीव पोहे ||1||
प्रपंचाचा भार न वाटेचि काही । 
नाम मुखी राही अखंडीत ||2||
तुकड्यादास म्हणे भजा शुद्ध भावे । 
तरीच केशवे दया कीजे ||3||