दुर्लभ मनुष्य-जन्म या जगती ।

दुर्लभ मनुष्य-जन्म या जगती । 
सुभाग्याच्या अंती प्राप्त होय ||धृ ||
फिरूनिया आला कोट्यावधी फेरा। 
जीव हा सामोरा मानव झाला ||1||
कोणी जो धाड़ील तया विशयवाटा। 
त्यावीण  करंटा कोण आहे ? ||2||
तुकड्यादास म्हणे शहाणे व्हा आधी । 
तोड़ा ही उपाधी संसाराची ||3||