मोठियांच्या अंगी राहे मोठेपण

मोठियांच्या अंगी राहे मोठेपण । 
गरीवासि कोण ओळखील ||धृ ||
तैसा देवा ! आम्हा भुलला वाटते ।
व्यर्थ किती जाते आयुष्य हे  ? ||1||
तुझा माझा संग होता एकरूप । 
जाहले स्वरूप भिन्न वाटे ||2||
तुकड्यादास म्हणे ऐसे नका करू । 
पायी घ्या लेकरू नका लोटू ||3||