भक्ति नोहे माझे रडणे दुःखाचे

भक्ति नोहे माझे रडणे दुःखाचे । 
तुझ्या विरहाचे ओढ़े येती ||धृ ||
नेत्री दाटे पूर कंठ़ी दाटे लाट । 
अंगा येई़ दाट रोमांच ते ||1||
तू माझा असोनी कां करिसी दूर ? 
वाटे हूर हूर जिवा हेचि ||2||
तुकडयादास म्हणे अगा नारायणा !। 
येऊ दे करुणा भाविकाची ||3||