देव भक्ताचा अभिमानी

देव भक्ताचा अभिमानी। 
नाचे तयाच्या कीर्तनी ||धृ ||
न सांगता काम करी । 
तो हा वैकुंठीचा हरी ||1||
कष्ट होऊ न दे दासा । 
ठेवी भक्तिचा भरवसा ||2||
तुकड्यादास म्हणे भक्त ।
देव प्राणासम पाळत ||3||