भारताच्या लोकां बहु भक्ति झाली ।
भारताच्या लोकां बहु भक्ति झाली ।
परि नाही आली गम्ये त्याची ||धृ ||
पोटाच्या कारणे वाजविती टाळ |
फोडती कपाळ यजमानाचे ||1||
भक्ति करू तरी कष्ट कासयासी ?।
ऐसेचि मानसी वाटे त्यांच्या ||2||
तुकड्यादास म्हणे सर्व व्यर्थ जाय
पुण्य करिता होय पाप माथा ||3||