न पड़ो प्रसंग ऐसिया लोकांचा

न पड़ो प्रसंग ऐसिया लोकांचा । 
जेणे विषयांचा संग लागे ||धृ ||
न पडो प्रसंग ऐसिया भूमिचा । 
जेथे निंदकांचा संग भेटे ||1||
न पड़ो प्रसंग ऐसिया खाण्याचा । 
तमोगुणी वाचा वाढे जेणे ||2||
तुकड्यादास म्हणे नको ऐसे रंग। 
कीर्तनासी भंग होय जेणे ||3||