माय लेकी ज्यासी ओळखू न येती
मायलेकी ज्यासी ओळखू न येती ।
काय त्याची मती नक्कीं गेली ||धृ ||
सूकरा समाने मनुष्य तो जाणा ।
तयाच्या वदना पाहू नये ||1||
पाहतांना त्यासी पापीवृत्ति होय ।
सहवासिता जाय पतनी कुळ ||2||
तुकडयादास म्हणे भोगाया विषय ।
करी हाय हाय कुत्रा जैसा ||3||