आधीचा विषयी मनाचा संशयी
आधीचा विषयी मनाचा संशयी ।
क्रोधाचा सवाई अविश्वासी ||धृ ||
जाय तीर्थस्थानी पाहे आडवोनी ।
द्रव्य ने चोरुनी देवाचिये ||1||
संत-दर्शना ये पाहे परस्त्रिया ।
वाहना ने पाया लोकांचिया ||2||
तुकड्यादास म्हणे ऐसे ज्याचे कर्म ।
तया देव धर्म संत भिती ||3||