बोलके पंडित बहू झाले जगी
बोलके पंडीत बहु झाले जगी ।
तेणे आम्हालागी सुख नोहे ||धृ ||
तोंडा तोंडी जरी झाले ब्रह्मज्ञान ।
बिना आचरण सुख नोहे ||1||
जाणावे मनाने करावे तनाने ।
पहावे जनाने जनार्दना ||2||
तुकड्यादास म्हणे मोला चढे सोने ।
कांसे पितळीने द्रव्य नये ||3||