काळ विचित्रला उठारे जागुनी ।

काळ विचित्रला उठारे जागुनी । 
धर्म-ध्वज कोणी हाती धरा ||धृ ||
प्राण-आहृतिची वेळ आली आता । 
कोण कोण जाता सांगा तेथे ||1||
नुसते तोंडाने काम ना भागते । 
प्राण जाय तेथे जाणाराचा ||2||
तुकडयादास म्हणे यारे या समोर । 
भारताचे पोर  म्हणोनिया ||3||