भावाविण भक्ती भक्तिविण ज्ञान

भावावीण भक्ति, भक्तिवीण ज्ञान । 
ज्ञानाविण स्थान केवि पावे ? ॥धृ॥
स्थान ना मिळाले तरी जन्म व्यर्थ । 
केले ते अनर्थ सर्वभावे ॥1॥
स्थान प्राप्त करा चला तया गावा । 
देवा आदिदेवा पावावया ।।2॥
नुकड्यादास म्हणे पायरीने यावे । 
उड़ता पडावे मार्गामाजी ॥3॥