कळते हे जना वर्म संतसंगी

कळते हे जना वर्म संतसंगी ।
माइया पांडुरंगी भेद नाही ॥धृ ॥
भक्तिचा भुकेला राहे सर्वकाळ । 
पाहतो केवळ प्रेमळासी ॥1॥
निर्बंध जोवरी नाही माझा जीव । 
तोवरी केशव दूर राहे  ॥2॥
तुकड्यादास म्हणे संतसंग करा ।
शुद्ध प्रेम धरा पांडुरंगी ॥3॥