धरा रे आवडी

धरा रे आवडी । 
देव होय अपुला गडी ॥धृ ॥
सोडू नका भाव । 
घरी येतो देवराव ॥1॥
करा मनोभावे ध्यान । 
तेज देतो नारायण ॥2॥
तुकड्या म्हणे करा । 
सोडा तोंडाच्या बाजारा ॥3॥