पापियांसी माफी देई देवराव
पापियांसी माफी देई देवराव ।
करिता उपाव योग्य ऐसा ॥धृ ॥
अजामिळा माफी मिळाली शेवटी ।
जपता अवचटी नारायण ॥1॥
पक्षातापे शुद्धि शास्त्राचे प्रमाण ।
संतांचे वचन हेचि सांगे ॥2॥
तुकड्यादास म्हणे पुन्हा करूं नये ।
गेलियाची सोय सारोनिया ।।3॥