प्रत्यक्षचि आम्हां दिसे । लोक वागताती कैसे

प्रत्यक्षचि आम्हां दिसे । 
लोक वागताती कैसे ॥धृ ॥
वरी त्यांचा भोळा भाव । 
परी चित्ती ना उपाव ।।1॥
मन अंतरात जळे । 
वरी भक्तिचे उमाळे ॥2॥
तुकड्यादास म्हणे कैसा । 
देव पावेल आपैसा ? ॥3॥