भिकारी म्हणणे वाटतसे सोपे । परंतु ना लपे भिकारीत्व
भिकारी म्हणणे वाटतसे सोपे ।
परंतु ना लपे भिकारीत्व ॥धृ॥
भिकारी तो एक मागे मोक्ष-भीक ।
देवद्वारी हाक ठोकोनिया ॥1॥
तयावीण राज्य लाभल्या विसरे ।
जरा त्याचे वारे अंगी नेघे ॥2॥
तुकड्यादास म्हणे ऐसे व्हा भिकारी ।
देव ही चाकरी करी तेव्हां ॥3॥