कासया मागसी मागणे देवासी
कासया मागसी मागणे देवासी ।
तुझ़ी काय त्यासी कीव नाही ? ॥धृ ॥
मागोनी आपूली दाविशील दैना ।
तेणे नारायणा चीड वाटे ॥1॥
म्हणोनिया तुज न देतील भीक ।
जाण हे निःशंक भोळ्या भक्ता ! ॥2॥
तुकड्यादास म्हणे पूर्ण हो निष्काम ।
तेव्हा करी काम देव पूर्ण ॥3॥