मित्र होती जेव्हां विजातीय जन
मित्र होती जेव्हां विजातीय जन ।
तेव्हां शुद्ध मन झाले जाणा ॥धृ ॥
व्याघ्र सर्प सर्व राहतील सवे ।
जराही न शिवे क्रूर वृत्ती ॥1॥
शत्रु कोणी नाही जगाचिये पाठी ।
ऐसी उफराटी वृत्ति होई ॥2॥
तुकड्यादास म्हणे सजाती विजाती ।
एक रघुपती संचरला ॥3॥