मनी घेई देव भक्तासी जेधवा ।

मनी घेई देव भक्तासी जेधवा । 
साक्षात्कार- दिवा दिसे त्यासी ॥धृ॥
दिव्यदृष्टि होई पहाया अंतर । 
वर्ष सविस्तर कळे आत्मी ॥1॥
वृत्ति समरसे होय ब्रह्माकार । 
वस्तुचे अंतर जाणे नित्य ॥2॥
तुकड्यादास म्हणे अनुभव येती । 
भेदभाव जाती निरसोनी ॥3॥