निरसोनि जाती भेदभाव सर्व

निरसोनि जाती भेदभाव सर्व ।
देहभाव गर्व हरोनिया ॥धृ ॥
जिकड़े पाहे तिकड़े आनंदी आनंद । 
सदा ब्रह्मानंद उठे त्यासी ॥1॥
भक्तिचे ते मुळ सापडे या हाता । 
कळिकाळ-वार्ता दूर झाली ॥2॥
तुकड्यादास म्हणे तारील आणिका । 
भक्तिच्या कौतुका काय वानू ? ॥3॥