पतिव्रते कांही न लागे सांगणे ।
पतिव्रते कांही न लागे सांगणे ।
प्रसन्नता जेणे होय त्याची ॥धृ ॥
तैसी भाव भक्ति भक्तालागी ठावि ।
न लागे पुसावी कोणा काही ॥1॥
जनी वंनीं नाम घेतसे अंतरी ।
वेळ नाही उरी रिती त्याची ॥2॥
तुकड्यादास म्हणे इच्छितो अनंत ।
दया भगवंत करी त्यासी ॥3॥