पतिव्रता जैसी रमे जीवलगी

पतिव्रता जैसी रमे जीवलगी । 
तैसा पांडुरंगी भक्त रमे ॥धृ ॥
जागृति वा स्वप्नी न विसरे जरा । 
तयावीण येरा तुच्छ मानी ॥1॥
सर्व सुखाचेही सुख ते लाधत । 
स्वरूप पहात नेत्री जेव्हां ॥2॥
तुकङ्यादास म्हणे धन्य त्याचे प्रेम । 
पूर्ण करी काम कोटी देव ॥3॥