भाग्यवंत तोचि गुणज्ञ देवाचा

भाग्यवंत तोचि गुणज्ञ देवाचा । 
पांडुरंगी ज्याचा भाव सदा ॥धृ॥
विसरेना कदा देवाचे चरण । 
आलिया मरण कदा काळी ॥1॥
सुख दुःख भोग त्यासी बराबरी । 
वृत्ति अहंकारी कदा नोहे ॥2॥
तुकड्यादास म्हणे धन्य त्याची कीर्ति । 
तिन्हीं लोकांवरती भाग्य त्याचे ॥3॥