देखिलागे सये ! राम तया घटी ।
देखिलागे सये ! राम तया घटी ।
जयाचिया पोटी प्रेम-रस ॥धृ ॥
ऐकावया कथा जागृत जो राहे ।
सदा चिंतिताहे नाम वाचे ॥1॥
गोड मनोभाव संतापायी प्रेम ।
तेथेचि विश्राम राम करी ॥2॥
तुकड्यादास म्हणे झोप नये ज्याला |
रामरूप झाला देह त्याचा ॥4॥