प्रल्हादाकारणे धावुनिया आला ।
प्रल्हादाकारणे धावुनिया आला ।
स्तंभी प्रगटला नरहरी ॥धृ॥
धृवासी रक्षिले वनी जाऊनिया ।
अभय दे तया अदळस्थानी ॥1॥
गजेंद्र सोडिला आलिया संकटी ।
गरुडासी पाठी सोडूनिया ॥2॥
तुकड्यादास म्हणे गर्जती पुराणे ।
माझे हे सांगणे उच्छिष्टचि ॥3॥