भक्ताचिया साठी देव होय कष्टी

भक्ताचिया साठी देव होय कष्टी । 
करी उठाउठी आपणचि ॥धृ ॥
दुर्योधनाघरी न खाय पक्वान्ना । 
विदुर-सदना कण्या भक्षी ॥1॥
अर्जुनाचे काम करी सारथ्याचे । 
वनोवंनी त्याचे संगे राहे ॥2॥
तुकड्यादास म्हणे द्रौपदिच्या लाजा ।
 वैकुंठीचा राजा वस्त्र देई ॥3॥