प्रत्यक्षचि कृष्णनाथ । सांगे उद्धवासी मात

प्रत्यक्षचि कृष्णनाथ । 
सांगे उद्धवासी मात ॥धृ॥
भक्त मला आवडतो । 
प्राणाहुनी मत्प्रिय जो ॥1॥
भक्ति मोहिनी माझिये । 
भक्ता प्रेमचि पाजिये ॥2॥
तुकड्यादास म्हणे । 
धन्य भक्तांचिये जिणे ॥3॥