भक्तिनिष्ठेवरी देव हा आशक । होऊनी माशुक भेटे भक्ता

भक्तिनिष्ठेवरी देव हा आशक । 
होऊनी माशुक भेटे भक्ता ॥धृ॥
एकपणी राहे दोघे होउनिया । 
प्रारब्धाची छाया भोगावया ॥1॥
संत तोचि देव देव तोचि संत । 
बोलिले हे मत ग्रंथी सर्व ॥2॥
तुकड्यादास म्हणे पूर्ण करा भक्ति । 
वर्म तुम्हांप्रती तेव्हां कळे ॥3॥