भक्तासम बळ नाही आणिकांसी
भक्तासम बळ नाही आणिकांसी ।
प्रत्यक्ष प्रभुसी हारविती ॥धृ॥
भीष्मे करविली प्रतिज्ञा खंडण ।
शस्त्र घ्याया जाण लावी देवा ॥1॥
थांबविला काळ ऊत्तरायणासाठी ।
स्मरता जगजेठी प्राण सोडी ॥2॥
तुकड्यादास म्हणे हनुमंत वीर ।
आणी द्रोणागिर हातावरी ॥3॥