भक्तांची थोरवी काय मी सांगावी

भक्तांची थोरवी काय मी सांगावी ? ।
आहे सर्व भावी दासा ठावे ॥धृ॥
देवाचे वचन मागा घेवविती । 
ऐसे भक्त होती कीर्तिवंत ॥1॥
आपुले मरण थांबविती बळे । 
फिरविती काळ मना ऐसे ।।2॥
तुकङ्यादास म्हणे धन्य त्यांची शक्ति 
भक्तिबळे मुक्ति हाती घेती ॥3॥