निरिच्छ ते भक्त मागती न देवा । कैलासाचा ठेवा जरी दिला

निरिच्छ ते भक्त मागती न देवा । 
कैलासाचा ठेवा जरी दिला ॥धृ॥
राज्य दिले तरी मानतील विष्टा । 
कधी त्यांची निष्ठा ढळू नेणे ॥1॥
मोक्षासी मारती लाथा मनोभावे । 
सुख नाम गावे गोड़ हेचि ॥2॥
तुकड्यादास म्हणे देव दास होई । 
तरी मागणेहि नसे त्यांना ॥3॥