कामी भजा राम नका खोवू वेळ
कामी भजा राम नका खोवू वेळ ।
वाट पाहे काळ टपोनिया ॥धृ॥
हातो हाती जीव जाईल निघोनी ।
अंतकाळी कोणी धाव नेघे ॥1॥
करा काही आता साधते जी सेवा ।
आळवा केशवा भक्तिभावे ॥2॥
तुकड्यादास म्हणे मानू नका वीट ।
मार्ग हा चोखट धरा आधी ॥3॥