देव आळवावा मनीं । काम करावे हातांनी

देव आळवावा मनीं । 
काम करावे हातांनी ॥धृ॥
सदा सत्पात्री उपकार । 
तोचि देवाचा किंकर ॥1॥
बोले मुखी वागे देही । 
वृत्ति त्याची निःसंदेही ॥2॥
तुकड्या म्हणे हाचि सार । 
वागे तोचि धन्य नर ॥3॥