मुख्य जीव-दया घ्यावी । जीव आघाती वाचवी

मुख्य जीव-दया घ्यावी । 
जीव आघाती वाचवी ॥
पाणी बुडतिया कोणा । 
धावुनी वाचवावे प्राणा ॥
कोणी अग्निमाजी पड़े । 
धरुनी घ्यावे जीवापाडे ।॥
तुकड्यादास म्हणे रक्षा । 
प्रियोत्तमा जगदीशा ॥