भक्तांनो ! निघाले कोठे देवासाठी ?
भक्तांनो ! निघाले कोठे देवासाठी ? ।
मंदिराच्या ओटी देव नाही ॥धृ॥
মकाळी निघोनी गेला तेथोनिया ।
भक्तासी पहाया देवराव ॥1॥
करी सारवण जनीचिया घरा ।
तुकयाच्या पोरा खेळवितो ॥2॥
तुकड्यादास म्हणे आहे तुम्हा प्रेम ।
करा त्याचे काम तरिच भेटे ॥3॥