देव राहे भक्ताघरी । काय पहाता मंदिरीं

देव राहे भक्ताघरी । 
काय पहाता  मंदिरीं ? ॥धृ॥
सेवा करा पतितांची । 
फळे भक्ति या देवाची ॥1॥
देव चिडले अंतरी। 
म्हणे भक्तां दुःख भारी ॥2॥
तुकड्या म्हणे जा रे । 
रंजल्यासी हात द्या रे ॥3॥