देवाचे वचन न ऐकावे कानीं
देवाचे वचन न ऐकावे कानीं ।
आपुल्याचि मनी खुश व्हावे ॥धृ॥
आवडे ते सदा करावे पूजन ।
जेणे दुःखे मन सोडावे ते ॥1॥
म्हणो कांही देव आम्हां काय ठावे ?।
दंडोत करावे कर्म माझे ॥2॥
तुकड्यादास म्हणे ऐसा ज्याचा भाव ।
तया देवराव फळे कैचा ? ॥3॥