देवासी पुजावे भक्ता त्रासवावे । वर्म हे केशवे वदले नाही
देवासी पुजावे भक्ता त्रासवावे ।
वर्म हे केशवे वदले नाही ॥धृ॥
शाप देई देव भक्तासी छळता ।
कधी प्रसन्नता नव्हे त्यासी ॥1॥
नेघे भक्ति त्यांची जे भक्ता छळती । कोट्यावरधी पंक्ति जरी केल्या॥2॥
तुकड्यादास म्हणे देव तरी पावे ।
भक्तांचिये गावे गुण सदा ॥3॥