येतां संकटाची वार्ता । चुलीपाशी लपे भ्राता

येतां संकटाची वार्ता । 
चुलीपाशी लपे भ्राता ॥धृ॥
म्हणे फोडू द्या मंदीर । 
करू दुसरे सुंदर ॥1॥
म्हणे देव बहू आहे । 
काय एकावीण राहे ? ॥2॥
तुकड्या म्हणे वारे भक्ति ! । 
नपुंसकाची विरक्ति ॥3॥