नाम गाता मुखी चित्त उभे राहे
नाम गाता मुखी चित्त उभे राहे ।
काय करितो हे आम्ही आता ? ॥धृ॥
नाम हनुमंत जपतो आवड़ी ।
आम्हा आहे गोड़ी विषयांची ॥1॥
बोलणे चालणे विपरीत दिसे ।
तेणे देव कैसे पावतील ? ॥2॥
तुकड्यादास म्हणे नाम नोहे शब्द ।
प्रत्यक्ष तो बोध चरित्राचा ॥3॥