देव करी कृपा तया भक्ता वरी
देव करी कृपा तया भक्ता वरी ।
बोले तैसा करी कर्में लोकी ॥धृ॥
बोलणे निराळे करणे निराळे ।
देवही निराळे पाही त्यासी ॥1॥
उपकारांसाठी देह समर्पावा ।
तरीच पावावा मोक्षसाठा ॥2॥
तुकङ्या म्हणे लोक परलोक ।
तरेल निःशंक सत्याचरणे ॥3॥