पुण्य दाविले संतांनी । घात केला भिकाऱ्यांनी

पुण्य दाविले संतांनी । 
घात केला भिकाऱ्यांनी ॥धृ॥
देणे तरी दूर झाले । 
परि प्राप नाही गेले ॥1॥
आम्ही करो काय । 
त्यांना भलतीच सोय ॥2॥
तुकड्या म्हणे पात्र धरा । 
तरिच सुकृते उद्धरा ॥3॥