दुःखाने पीडिला, द्रव्याने नाडला
दुःखाने पीडिला, द्रव्याने नाडला ।
कष्टावीण झाला पंगु जैसा ॥धृ॥
तैसिया आधार देऊनी चालवा ।
हातभार द्यावा साहे तैसा ॥1॥
उद्योगाचे अंग दाखवावे तया ।
व्यर्थ पोसुनिया ठेवू नये ॥2॥
तुकड्यादास म्हणे कष्टाचा संसार ।
कष्टावीण नर सुखी नोहे ॥3॥