याद ठेवा, कधी बळी द्याल जीवां
याद ठेवा, कधी बळी द्याल जीवां
कुळामध्ये दिवा न राहील ॥धृ॥
तयाचा तो आत्मा अंती देई शाप ।
लागतसे पाप दुर्बळाचे ॥1॥
जैसा त्या वघसी तैसी होय गती ।
काळ-घरी जाती कापणारे ॥2॥
तुकङ्यादास म्हणे जीवासी रक्षावे ।
तरिच पुण्य पावे जन्मोजन्मी ॥3॥