यज्ञयागी कोणी बळीदान देती । दया नाही चित्ती जरा त्यांच्या

यज्ञयागी कोणी बळीदान देती । 
दया नाही चित्ती जरा त्यांच्या ॥धृ॥
फळाचिये आशे कापती बकरे । 
देती टोळभैरे बळीदान ॥1॥
कर्मठ ब्राम्हण तया काय दया ? । 
नेती कापावया देवी जीव ॥2॥
तुकड्यादास म्हणे न्यायी आहे देव । 
भोगवी केशव केले कर्म ॥3॥