दुजियाचा जीव गेला तरी चाले । सुखी आम्हा केले पाहिजे देवे

दुजियाचा जीव गेला तरी चाले । 
सुखी आम्हा केले पाहिजे देवे ॥धृ॥
ऐसा ज्याचा भाव तमोगुणावरी । 
कैसा त्या श्रीहरी पाविजेल ? ॥1॥
प्रभुसी सारिखे सर्व जीव आहे । 
दयाळू ती माय सर्वालागी ॥2॥
तुकड्यादास म्हणे स्वार्थरूप जन । 
भोगती दारूण हत्यापाप ॥3॥